कविता करणे माझा छंद आहे ,
पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र मी थोडा मंद आहे !

कविता काय सोपी असते , फक्त शब्दांचा  खेळ करायचा ,
अभ्यास म्हंटल कि , डोक्याचा पूर्णपणे  भुसा करायचा !
कविता बनवायची असेल तेव्हा १०० टक्के  काम पूर्ण करायचो,
पण अभ्यासात मात्र प्रत्येक वेळीस जोरदार मार खायचो  !

कविता माझ्या डोक्यात कायमची जिवंत असायची ,
पण अभ्यासाची पाने मात्र  दूसऱ्या दिवशी डोक्यातून  नाहीशी व्हायची !
डोळे मिटले कि कविता च्या शब्दांचे चांदणे  दिसायचे ,
आणि डोळे उघडताच , गणित भूगोल माझ्या पासन दूर पळायचे !!

पळून गेलेला विषय , मी कधीच पकडण्याचा प्रयत्न केल नाही,
कारण कविते नि भरलेले डोके,  कधीच अभ्यासाचं होऊ शकले नाही !

पण काय करू , फक्त कविता करून जगता येत नाही ,
फक्त शब्दांनी भूख मिटवता येत नाही ,
तर अभ्यास मात्र हा करावाच लागतो ,
भरपूर शिकून , संघर्ष करून,  जगावच लागत !
भरपूर शिकून , संघर्ष करून, जगावच लागत !!

— आशुतोष चित्राव